उद्यापासून रेल्वेच्या 200 अतिरिक्त गाड्या धावणार ; रेल्वे मंत्र्याची माहिती

200-special-trains-to-run-across-the-india-from-1st-june

मुंबई : भारतीय रेल्वेच्या 200 अतिरिक्त गाड्या उद्या १ जूनपासून धावणार आहेत. या संदर्भातील घोषणा आधीच रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली होती. त्यानुसार देशात २०० अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार आहेत. तसंच या गाड्या सध्या कार्यरत असलेल्या १५ कामगार आणि एसी विशेष गाड्यांपेक्षा वेगळया असतील.

दरम्यान, या गाडयांसाठीच तिकीट बुकिंग हे २१ मे पासून सुरू करण्यात आलं आहे. तर प्रवाशांना आता या गाड्यांसाठी १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांपूर्वी रिजर्वेशन करता येणार आहे. प्रवाशांना या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांचा पालन करणं गरजेचं आहे.

या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :

२०० अतिरिक्त रेल्वे गाड्यांसाठी तिकीट बुकिंग करण्यात करीता अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅप वापरता येईल. तर या व्यतिरिक्त रेल्वे स्टेशन काउंटर, टपाल कार्यालय, अधिकृत एजंट, प्रवासी तिकीट सुविधा केंद्र, प्रवासी आरक्षण प्रणाली आणि सामान्य सेवा केंद्राकडूनही तिकीट बुकिंग करता येणार आहे.

सर्व विशेष रेल्वे गाड्यांसाठी आगाऊ कालावधी ३० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यात १२ मे पासून राजधानीच्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या १५ गाड्यांचा आणि १ जूनपासूनच्या २०० अतिरिक्त गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासी या गाड्यांसाठी १२० दिवस आधी तिकीट बुक करू शकतील.

प्रवासावेळी कोणत्याही प्रवाशाला आरक्षणाशिवाय तिकीट दिलं जाणार नाही. म्हणजेच प्रवासावेळी तिकीट अधिकाऱ्याला कोणालाही तिकीट देता येणार नाही.

आरएसी आणि वेटिंग तिकिट दिलं जाईल. मात्र वेटिंग तिकीट असलेल्या व्यक्तीला ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही. सध्याच्या नियमांनुसार एसी १ मध्ये २०, एसी २ मध्ये ५०, एसी ३ मध्ये १०० आणि स्लीपर कोचमध्ये २०० वेटिंग तिकीट बुक करता येणार आहेत.

पहिला चार्ट ट्रेनच्या चालू वेळेच्या कमीतकमी ४ तास आधी तयार केला जाईल आणि दुसरा चार्ट निर्धारित सुटण्याच्या वेळेच्या किमान २ तास आधी तयार केला जाईल. पहिल्या आणि दुसर्‍या चार्टच्या तयारी दरम्यान फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगला परवानगी असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER