चांदोलीसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून 200 कोटी

Min Jayant Patil

सांगली : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वाकुर्डे बुद्रुक योजना व चांदोली प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या तीन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पर्यंत पाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

पेठ (ता. वाळवा) येथे आमदार नाईक यांच्याहस्ते वाळवा तालुक्यातील 42 गावांतील कार्यकर्त्यांकडे 1 हजार 977 रेशनकार्ड वाटप करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार नाईक म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक व चांदोली प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पाणी योजना रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. आता यासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे योजनेला गती मिळणार आहे. चांदोली प्रकल्पाचेही काम मार्गी लागणार असल्याने जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER