महाराष्ट्रात आज आढळले २० हजार ४८२ रुग्ण; एकूण संख्या १० लाख ९७ हजार ८५६

Rajesh Tope Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाच्या २० हजार ४८२ रुग्णांची नोंद झाली. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर पोहोचली आहे. ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ४०९ झाली आहे. मृत्यूदर २.७७ टक्के आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात १९ हजार ४२३ रुग्णांना सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

आजपर्यंत ५४ लाख ९ हजार ६० चाचण्या करण्यात आल्या. १० लाख ९७ हजार ८५६ पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात १७ लाख ३४ हजार १६४ संशयित रुग्ण घरी विलगीकरणात आहेत. जण होम क्वारंटाइन आहेत, तर ३७ हजार २२५ जण संस्थात्मक क्वारंटइन आहेत.

Check PDF Online updates

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER