चक्रीवादळाच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईला धोका

Mumbai Cyclone

मुंबई : चक्रीवादळांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून त्याचा मुंबईतील सुमारे २ कोटी लोकांवर परिणाम होईल, असा इशारा एका अभ्यासात देण्यात आला आहे. १९७० ते १९७९ या काळात दरवर्षी २ चक्रीवादळ येत होते; २०१० – २०१९ या वर्षात चक्रीवादळांची संख्या १२ झाली आहे.

चक्रीवादळाच्या वाढत्या संख्येसोबत वादळाच्या वेळी समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढते आहे. या बदलत्या हवामानाच्या विधवन्स्क परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी फक्त दहा वर्षांचा काळ आपल्याजवळ आहे, अस इशारा देण्यात आला आहे.

हा अहवाल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय हवामान विभाग, प्रेस माहिती ब्युरो आणि जागतिक हवामान संस्था यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कडील आकडेवारीवरून तयार करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER