किल्ले रायगड संवर्धनासाठी अद्यापही २० कोटींच्या निधीची प्रतीक्षा

Raigad fort-uddhav govt

रायगड : किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी आघाडी सरकारने ५२० कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरण कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या आराखडय़ानुसार रायगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तूचे संवर्धन, तत्कालीन पद्धतीच्या माíगकेचे बांधकाम, पर्यटकांच्या सोयी तसेच सुरक्षेच्या बाबी, राजमाता जिजाऊंचा वाडा तसेच राजमाता जिजाऊंची समाधी आदी ठिकाणच्या दुरुस्ती व निगडित कामे, रायगड परिक्रमा मार्ग, रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रज्जू मार्ग आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी अंदाजे ५२० कोटींचा निधी आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले रायगडाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी राज्य सरकाने हालचाली सुरू केल्या आहेत. कोकण आयुक्तांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी ५२० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी प्रदान केली आहे. पुरातत्त्व विभाग आणि राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमातून किल्ले रायगडाचे सुशोभीकरण व संवर्धन केले जाणार आहे.

पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०१६-१७ साठी २०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यातील १६० कोटींचा निधी डिसेंबर अखेपर्यंत उपलब्ध होणार आहे. आत्ता पर्यंत ३ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून शिल्लक असलेल्या १५६ कोटींपकी ९ कोटींचा निधी किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या अंतर्गत रायगड किल्ल्यावर विविध ठिकाणी दगडी माíगका तयार करण्याची कामे केली जाणार आहेत. नगारखाना ते बाजारपेठ परिसरातील माíगकेसाठी ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून दिला जाणार आहे. जगदीश्वर मंदिर ते बाजारपेठ परिसरातील माíगकेसाठी ७ कोटी रुपयांची गरज असून या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. किल्ल्यावरील शिरकाई देवी मंदिर ते महादरवाजापर्यंत दगडी माíगकेचे काम केले जाणार आहे. यासाठी ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात पहिल्या टप्प्यासाठी ४ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.

ही सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी हे या योजनेचे आहरण व सिवतरण अधिकारी कामकाज पाहणार आहेत. तर रायगडच्या जिल्हाधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून कामावर लक्ष ठेवणार आहेत. निधी उपलब्ध झाल्याने किल्ला संवर्धनाची मंजूर कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

शिवजयंतीदिनी मुनगंटीवारांनी केले ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ उड्डाणपुलाचं उद्घाटन