विधानसभा मतदार संघातील 2 लाख 92 हजार मतदार मतदानाचा बजावणार हक्क

assembly constituency 2019.jpg

वसमत /तालुका प्रतिनिधी: विधानसभा मतदार संघातील एकूण 322 मतदान केंद्रामध्ये दिनांक 21 ऑक्टो 2019 रोजी सकाळी 07.00 वाजेपासून सायंकाळी 06.00 वाजे पर्यत मतदान घेण्यांत येणार आहे.त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी,दिव्यांग मतदारासाठी आवश्यक सुविधा, पुरेसा प्रकाश राहिल यासाठी प्रशासन कोणतीही कमतरता करणार नाही यासाठी प्रत्येक केंद्रावर नियुक्त निवडणुक क्षेत्रीय अधिकारी यांना बाबनिहाय पडताळणी करुन अहवाल मागविला आहे सदरील अहवालामध्ये काही सुविधा अपु-या असतील तर त्या तात्काळ पुर्ण करण्यासाठी विशेष पथकाकडून कार्यवाही करण्यांत येणार आहे.

वसमत विधानसभा मतदार संघाअंतर्गत एकूण मतदान केंद्र 322 असून वसमत तालुक्यातील 235 मतदान केंद्र असून औंढा तालुक्यात 87 मतदान केंद्र आहेत. वसमत विधानसभा मतदार संघातील एकूण 322 मतदान केंद्रासाठी 38 झोनची निमीर्ती करण्यांत आलेली असून मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे ने-आण करण्यासाठी 130 वाहनाची आवश्यकता आहे त्यामध्ये 06 एसटी बस,26 मिनीबस,98 जिप चे नियोजन करण्यांत आलेले आहेत.सदरील कक्षाचे नोडल अधिकारी सचिन जैस्वाल, नायब तहसीलदार आहेत.वाहतूक व्यवस्थे करिता वाहणासमवेत रुट गाईड म्हणून ग्रामसेवक व कृषी विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यांत आलेले आहेत.