राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे दाखल

Court Decision

मुंबई : लॉकडाऊन (Lockdown) सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात (Corona virus) कलम १८८ नुसार २ लाख ७० हजार ९९५ गुन्हे दाखल झाले आहेत. ३७ हजार ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २८ कोटी ५१ लाख ६२ हजार ५६४ रुपये दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh) यांनी दिली.

  • राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २७ सप्टेंबर या कालावधीत
  • पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३६४ (८९५ व्यक्ती ताब्यात)
  • १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ३३५
  • अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
  • जप्त केलेली वाहने – ९६, ४३०
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील
  • २२० पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २४५ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.

पोलिसांना कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER