स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद होणार ऑनलाइन

Kolhapur .jpg

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ऊस परिषदेला मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंधर पाटील यांनी, ‘ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला व्हर्च्युअल ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन येथे ऑनलाइन पद्धतीने ऊस परिषद होईल.’असे स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर सोमवारी, (ता. २ नोव्हेंबर) आयोजित केली होती. या परिषदेत स्वाभिमानी संघटना ऊस दर जाहीर करते. यंदा संघटनेने, २ नोव्हेंबर रोजी विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान यंदाच्या ऊस परिषदेवर कोरोनाचे सावट होते.

दरम्यान ऊस परिषदेला परवानगी मिळावी यासाठी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक व अन्य पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ’स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. पाटील म्हणाले, ‘ऊस परिषदेला परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलो. तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले, शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरच्या शाही दसरा मेळावा व मुंबईतील शिवसेनेचा मेळावा ऑनलाइन पद्धतीने झाले. तुम्ही सामाजिक हिताचेच काम करताय. आणि त्या सामाजिक हिताला बाधा येऊ नये म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही ऊस परिषद ऑनलाइन पद्धतीने घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER