१९८४ भोपाळ गॅस ट्रॅजेडीवर बनणार वेब सिरीज

Web Series

ग्लोबल वन स्टुडिओसमवेत फिल्ममेकर रॉनी स्क्रूवाला यांची कंपनी आरएसव्हीपी यांनी एका पुस्तकाचे हक्क विकत घेतले, ज्यावर ते मालिका तयार करणार आहेत. हे पुस्तक डोमिनिक लैपियर आणि जेवियर मोरो यांनी २००१ मध्ये लिहिले होते आणि ही कथा १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘फाइव पास्ट मिडनाइट इन भोपाल- द एपिक स्टोरी ऑफ द वर्ल्ड्स डेडलिएस्ट इंडस्ट्रियल डिजास्टर’.

भोपाळमध्ये २ – ३ डिसेंबर १९८४ रोजी  मिथाईल आयसोसायनेट गॅस गळतीमुळे हजारो लोकांनी  जीव गमावला आणि या वायूचा परिणाम बऱ्याच लोकांना झाला. या घटनेवर डोमिनिक आणि जेवियर यांनी पुस्तक लिहिले.  तेव्हा ते  शेकडो प्रत्यक्षदर्शींशी बोलले आणि घटनेची गंभीरता समजली. त्यानंतर त्यांनी  ‘फाइव पास्ट मिडनाइट इन भोपाल’ पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामुळे प्रभावित, रॉनी स्क्रूवाला आणि रमेश कृष्णमूर्ती यांनी मालिका तयार करण्यासाठी त्याचे ऑडिओ आणि व्हिज्युअल हक्क विकत घेतले.

गेल्या बुधवारी आणि गुरुवारी त्या घटनेला ३६ वर्षे झाली आहेत. रॉनी यांच्याजवळ या घटनेवरील मालिकेची घोषणा करण्यासाठी हाच सर्वांत चांगला वेळ होता. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘हृदय हेलावणारी ही कहाणी पडद्यावर दाखवणे फार महत्त्वाचे आहे. ही एक कहाणी आहे जी लोकांच्या हृदयाला स्पर्श करते आणि त्याच वेळी राग आणि करुणाही येईल. ही कहाणी आंतरराष्ट्रीय धोरणांचे निर्धारण आणि ते कसे कार्य करतात यास  आव्हान देईल. या सर्वांमधून उठून मानवतेला जागृत करण्याचेही काम होईल. ही कहाणी सांगण्यासाठी यापेक्षा चांगला काळ असू शकत नाही.

‘रमेश कृष्णमूर्ती यांच्यासमवेत रॉनी स्क्रूवाला यांनी पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत, पण आता मालिका निर्मितीत सामील होण्यासाठी ते शीर्ष क्रमांकाचे लेखक, दिग्दर्शक आणि सर्जनशील लोक शोधत आहेत. या विभागात कोण  काम करणार आहेत, याबद्दल रॉनी यांनी अद्याप काहीही सांगितले नाही.

१९८४ साली झालेली भोपाळ गॅस शोकांतिका प्रचंड होती. या शोकांतिकेबद्दल चित्रपटाचा प्रकल्प बनवण्यावर लक्ष केंद्रित करणारी रॉनी स्क्रूवाला प्रथम नाही. यापूर्वी १९९९ साली महेश मथाई यांनी ‘भोपाळ एक्स्प्रेस’च्या नावाने एक चित्रपट बनविला होता. या चित्रपटात केके मेनन, नेत्रा रघुरामन, नसीरुद्दीन शाह, झीनत अमान, विजय राज इत्यादी मुख्य भूमिका आहेत. २०१४ साली रवि कुमारच्या दिग्दर्शनात ‘भोपाळ : ए प्रेयर्स ऑफ रेन’ हा चित्रपटही तयार करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER