भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल

mutations

नवी दिल्ली : कोरोना (Corona virus) संसर्गाच्या नवीन स्ट्रेनमुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या स्वरूपात होणाऱ्या नवनवीन बदलांचा शोध घेण्यासाठी देशात ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ (Genome sequencing) केले जात आहे. देशात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. यातून १९ प्रकारच्या आनुवांशिक बदलांची माहिती समोर आली आहे. भारत, इंग्लंडसह अनेक देशातील वैज्ञानिक जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आलेल्या माहितीवर अभ्यास करीत आहे. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक अँड इंटेगेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) (IGIB) तसेच आंध्र प्रदेश येथील कुर्नूल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून यासंबंधी अभ्यास केला जात आहे.

विशेष म्हणजे इतर सर्व स्वरूपांच्या तुलनेत ‘एस : एन ४४० के’ जिनोममध्ये तुलनेत २.१ टक्क्यांहून अधिक वेगाने पसरण्याची क्षमता आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये कोरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

जगभरात कोरोनाच्या जिनोम सिक्वेन्सिंगची माहिती संकेतस्थळावर एकत्रित केली जाते. प्रत्येक देशाकडून यावर माहिती उपलब्ध करवून दिली जात आहे. १७ डिसेंबरपर्यंत २ लाख ६५ हजार ७९ नमुन्यांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. १३३ देशात एकत्रित केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या माहितीवर अभ्यास सुरू आहे. यातून जागतिक पातळीवर ८६ प्रकारचे आनुवांशिक बदल दिसून आले आहेत. आंध्र प्रदेशात २७७ जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये सर्वाधिक वेगाने पसरणारा जिनोम ३३ टक्के आढळून आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER