अन्वय नाईक यांच्या १९ मालमत्ता करण्यात आल्या उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या नावे ! सोमय्या यांचा आरोप

Kirit Somaiya - CM Uddhav Thackeray

रायगड :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्तीची संपत्ती स्वत:च्या नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला. ही मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्वय नाईक आहेत, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. या जमीन खरेदीचे सर्व व्यवहार कोर्टात उघड करेन, असा इशारा त्यांनी दिला. या १९ मालमत्तांचा  उल्लेख उद्धव ठाकरे यांच्या निवडणुकीच्या संपत्ती प्रतिज्ञापत्रात नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. (Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray)

किरीट सोमय्या यांनी आज रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात जाऊन ग्रामपंचायतला भेट दिली. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला. दिवंगत अन्वय नाईक यांच्या मालकीच्या १९ मालमत्ता (५ कोटी २९ लाख किमतीच्या) ग्रामपंचायतीने ठाकरे कुटुंबाच्या नावे कशा प्रकारे केल्या हे पाहून मान शरमेने खाली जाते. २०१४ मध्ये अन्वय नाईक यांच्याशी ठाकरे परिवाराने करार केला होता. नाईक यांच्या मृत्यूनंतर ठाकरे परिवाराने ही जमीन स्वत:च्या नावे करून घेतली.

ग्रामपंचायतचा खुलासा
सोमय्या यांच्या आरोपावर कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी खुलासा केला की, २०१४ मध्ये रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा वायकर यांनी नऊ एकर जमीन खरेदी केली होती. नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस अज्ञा नाईक आणि वर्षा नाईक यांनी २०१८ मध्ये एक पत्र सादर करून ही जमीन विकण्यास हरकत नसल्याचे कळवले. त्यानंतर रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावावर ही जमीन करण्यात आली.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (५३) यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील कावीर गावातील घरी आत्महत्या केली. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (८४) यांचेही शव आढळले होते. त्यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती.

अन्वय नाईक (Anvay Naik) इंटिरिअर डिझायनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या  कॉन्कर्ड   कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझायनिंगचे काम केले होते. (Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray)

हे काम पूर्ण झाल्यानंतरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. (Kirit Somaiya allegations on Uddhav Thackeray) असा आरोप आहे.

ही बातमी पण वाचा : ‘शिवसेनेने सत्तेची लाचारी सोडल्यास औरंगाबादचे नाव संभाजीनगर करु शकेल’ – मनसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER