तामिळनाडूत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १९ जणांचा मृत्यू

Accident news

चेन्नई : तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२० फेब्रुवारी) तामिळनाडूमध्ये भीषण अपघात झाला. तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकातील बंगळुरूमधून केरळच्या दिशेने ही बस जात असताना हा अपघात झाला. तिरपूरच्या सरकारी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.