पुण्यात १९ नगरसेवक भाजप सोडणार? गिरीश बापट यांनी दिले ‘हे’ उत्तर

Girish Bapat

पुणे : पुणे (Pune) शहरातील १९ नगरसेवक भारतीय जनता पक्षाला (BJP) सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या चर्चेचा भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी इन्कार केला आहे. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा गिरीश बापट यांनी केला. इतकंच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनीही या चर्चेचं खंडन केलं आहे. मुळीक म्हणाले, “नगरसेवक भाजपमध्ये नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही.

आमचा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही. कुणीतरी मुद्दामहून ही बातमी पेरली आहे. ज्यामध्ये काहीही तथ्य नाही. दरम्यान गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतून मोठी इनकमिंग भाजपात झाली होती. मात्र यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER