भाजपचे १९ नगरसेवक अजितदादांच्या संपर्कात; राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

Ajit Pawar - BJP Flags

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना पक्षांतरणाचे वेध लागले आहे. पुणे महापालिकेतील भाजपचे (BJP) तब्बल १९ नगरसेवक महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जाण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे हे नगरसेवक राष्ट्रवादीच्या (NCP) संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेत पद न मिळाल्याने हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे १९ नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या नगरसेवकांचं बंड थंड करण्यासाठी भाजपचं नेतृत्व सतर्क झाल्याचंही कळतं.

मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी शहराध्यक्षांकडे केली होती. पण याबाबत टाळाटाळ करत निवडक लोकांनाच विचारपूस होत असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचं कळतं. दरम्यान, या चर्चांमध्ये सत्यता नाही. हा निव्वळ खोडसाळपणा आहे. नगरसेवकांच्या नाराजीचा आणि बंडखोरीचा कोणताही विषय भाजपच्या गटात नाही. एकहाती सत्ता महापालिकेत आहे.

निवडणूक जवळ आल्यामुळे जाणीवपूर्वक हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया महापौर, मुरलीधर मोहोळ यांनी दिली. १०० टक्के कुठलीही नाराजी नाही. सर्व समित्यांमध्ये सर्व नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. उर्वरित नगरसेवकांना या वर्षी संधी दिली आहे. निधी कमी देण्यात आला असं चित्र कुठेच नाही. नगरसेवक हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं वृत्त साप चुकीचं आहे, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER