गळीत हंगामाने घेतली गती महिन्यात १८१ लाख टन उसाचे गाळप

Sugar season

पुणे :- जिल्ह्यातील साखर हंगाम ५ नोव्हेंबरच्या दरम्यान सुरु झाला असून आतापर्यंत सरासरी १८१ लाख टन उसाचे गाळप झाले. राज्यातील १५८ साखर कारखान्यांनी तब्बल १ कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. पुणे जिल्ह्यात २६ कारखान्यांनी ४३ लाख ५८ हजार, कोल्हापूर आणि सांगली (Sangli) जिल्ह्यातील ३३ कारखान्यांनी ३७ लाख ६७ हजार, सोलापुरातील ३३ कारखान्यांनी ३८ लाख ६७ हजार, अहमदनगर विभागातील २५ कारखान्यांनी ३० लाख ७४ हजार, औरंगाबाद विभागातील २० कारखान्यांनी १७ लाख ४२ हजार, नांदेड विभागातील १९ कारखान्यांनी १२ लाख १४ हजार तर अमरावती (Amravati) विभागातील दोन कारखान्यांनी दीड लाख टन उसाचे गाळप केले आहे.

लांबलेला परतीचा पाऊस, उसतोडणी कामगारांच्या मागण्यासाठी संप, एफआरपीसह वाढीव दराची मागणी आदीकारणांनी यंदाचा गळीत हंगाम १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान सुरु झाला. महिन्याभरात राज्यात एक कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले. यातून १५७.१७ लाख क्विंटल साखर उत्पादीत झाली. आतापर्यंत तुटलेल्या उसाला सरासरी ८.६५ टक्के उतारा मिळाला आहे. बहूतांश कारखान्यांनी तुटलेल्या उसाची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER