सेवाग्राम विकासासाठी १८ कोटी रुपयांचा निधी- सुधीर मुनगंटीवार

sudhir mungatiwar

मुंबई :- वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १६२.५१ कोटी रुपयांचा सेवाग्राम विकास आराखडा राबविला जात आहे. या आराखड्याअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी २०१८-१९ या वित्तीय वर्षात २६ कोटी ८ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यापैकी १८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी वर्धा यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या संबंधीचा शासननिर्णय नियोजन विभागाने ४ जानेवारी २०१९ रोजी निर्गमित केला आहे.

घृष्णेश्वर, वेरुळसाठी ९ कोटी रुपयांचा निधी ते पुढे म्हणाले की, श्रीक्षेत्र घृष्णेश्वर, वेरुळ ता. खुलताबाद जि. औरंगाबाद विकास आराखड्यासही शासनाने मान्यता दिली आहे. हा आराखडा ११२.४१ कोटी रुपयांचा आहे. या आराखड्यातील सन २०१८-१९ या अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या १३ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीपैकी ९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.