दुर्घटना : सन २०१९मध्ये १७९ मुंबईकर जीवाला मुकले

Mallad East wall collapse

मुंबई : मागील वर्षी म्हणजे, सन २०१९मध्ये विविध प्रकारच्या दुर्घटनांमध्ये १७९ मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या राजधानीत आपले प्राण गमावलेत.

अधिकार फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे शकील अहमद यांनी माहितीच्या अधिकारातून विचारणा केली असता, ही बाब पुढे आली. यानुसार, २०१९ या वर्षात मुंबईत १३ हजार दुर्घटना झाल्यात.

एकूण १७९ दुर्घटनाबळींमध्ये ४७ महिला आणि १३२ पुरुषांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्यू मालाड येथे भिंत खचल्याने झालेल्या दुर्घटनेत झाले. यावेळी ३० जणांनाआपले प्राण गमवावे लागले होते. १ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ही भिंत खचली होती.