जॅकीच्या हातून १७ वेळा थोबाडीत खाल्ली या नायकाने

Jackie-Anil Kapoor

चित्रपटाच्या शूटिंग वेळी (Shooting) दृश्य वास्तविक वाटावे यासाठी दिग्दर्शक कलाकारांना वास्तव अभिनय करण्यास सांगतो. अशा वेळी प्रेम किंवा कौटुंबिक प्रसंगात तशी अडचण उद्भवत नाही. परंतु भावनात्मक दृश्यात अनेक वेळा अडचण उद्भवते. अशा वेळी कलाकारांचा कस लागतो आणि दिग्दर्शकाच्या अनुभवाचा कस लागतो. जेव्हा दोन मोठे कलाकार एकमेकांसमोर असतात आणि त्यापैकी एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराच्या थोबाडीत मारायचे असते तेव्हा तर फार अडचण होते. असाच काहीसा प्रकार ‘परिंदा’ चित्रपटाच्या वेळेस घडला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) जॅकी आणि अनिल यांच्यात एक दृश्य चित्रित करीत होते. चित्रपटात जॅकी ( Jackie) अनिल कपूरचा मोठा भाऊ दाखवला आहे. या दृश्यात जॅकीला अनिल कपूरच्या थोबाडीत मारायचे होते. जॅकीने अनिल कपूरच्या (Anil Kapoor) थोबाडीत मारले. दिग्दर्शकाने शॉट ओके केला. पण अनिल कपूरचे समाधान झाले नाही. आपला अभिनय चांगला नसल्याचे त्याने सांगितले आणि आणखी एकदा शूट करू या, अशी विनंती विधु विनोद चोप्राला केली.

नायकच असे सांगतोय म्हटल्यानंतर विधुही यासाठी तयार झाला. शॉट झाला, पण अनिल कपूर स्वतः या शॉटवर समाधानी न झाल्याने रिटेक व रिटेक झाले आणि चार-पाच वेळा नव्हे तर चक्क १७ वेळा जॅकीने अनिल कपूरच्या थोबाडीत लगावली होती. विधु विनोद चोप्राने स्वतः या दृश्याची ही माहिती सोशल मीडियावर दिली. अनिल कपूर आणि जॅकीनेही या ट्विटला रिट्विट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER