कोल्हापुरात दिवसभरात 17 रुग्णांची भर : एकूण संख्या 278

Kolhapur - Coronavirus

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजता 829 प्राप्त कोरोना रुग्ण तपासणी अहवालापैकी 17 अहवाल पॉझीटिव्ह आले, तर 811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 89 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज दिवसभरात आलेल्या 17 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा-2, भुदरगड-8, शाहूवाडी-7 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे –
आजरा-15, भुदरगड-32, चंदगड-18, गडहिंग्लज-13, गगनबावडा- 5, हातकणंगले-3, कागल-1, करवीर-10, पन्हाळा-15, राधानगरी- 42, शाहूवाडी- 89, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र-10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 274 आणि पुणे -1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 278 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER