१६ विरोधी पक्ष टाकणार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार

Ram Nath Kovind

दिल्ली :- उद्या, २९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राष्ट्रपतींच्या भाषणावर १६ विरोधी पक्ष बहिष्कार (16 Opposition parties)टाकणार आहेत. विरोधी पक्षांनी पत्रक काढून म्हटले आहे की, हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने कृषी कायद्यांना (Agriculture Law) मंजुरी देण्यात आली त्याचा विरोध करण्यासाठी हा बहिष्कार टाकणार आहोत.

अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या दोन्ही सदनांसमोरच्या अभिभाषणाने होते. यंदाच्या अधिवेशनाआधी होणाऱ्या या अभिभाषाणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जेकेएनसी, डीएमके, एआयटीसी, शिवसेना, समाजवादी पार्टी, आरजेडी, सीपीआयएमएल, सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ काँग्रेस आणि एआययुडीएफसारख्या पक्षांचा समावेश आहे. राज्यसभेचे सदस्य आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी या बहिष्कारासंदर्भातील निर्णयाची माहिती दिल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER