जिल्हा परिषदेत शासनाची १६ लाखांची फसवणूक : गुन्हा दाखल

FIR

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेला शिंगणापूर (ता. करवीर) येथील पुरविण्यात आलेल्या कुस्ती, कबड्डी मॅटच्या गुणवत्तेबाबत चुकीच्या अहवालाद्वारे शासनाची १६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. यात एका प्राचार्याचाही समावेश आहे. अलोक यादव (सनराईज इव्हेंट अँड एक्झिबिशन, कोल्हापूर) आणि कराड प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला या शाळेत कुस्तीचे व कबड्डीचे मॅट खरेदी करण्याची निविदा मागविण्यात आली होती. ही निविदा सनराईज इव्हेंट अँड  एक्झिबिशनचे अलोक यादव यांना प्राप्त झाली होती. निविदेप्रमाणे पुरवठा करण्यात येणाऱ्या साहित्याची शासकीय तपासणी करण्याची जबाबदारी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आली होती. हे साहित्य योग्य गुणवत्तेचे नसतानाही ती योग्यतेची आहे, असा चुकीचा अहवाल त्यांनी पाठविला.

हा अहवाल योग्य समजून संबंधित  प्रशासनाने  संबंधित  प्राचार्यांना मॅटसाठी १५ लाख ९९ हजार ९९९ इतकी रक्कम दिली होती. यादव व प्राचार्य या दोघांनी निविदेप्रमाणे गुणवत्तापूर्ण मॅट नाही हे माहीत असतानाही त्याचा पुरवठा करत शासनाची फसवणूक केली. हा प्रकार ५  ते १८ मार्च 2019 दरम्यान जिल्हा परिषद कार्यालय व  संबंधित  शाळेत घडला. अशी फिर्याद शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री संजय जाधव यांनी पोलिसात दिली. त्यानुसार दोघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER