अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोगाम होणार लॉन्च; रमेश पोखरियाल यांच्या हस्ते शुभारंभ

Dr. Ramesh Pokhriyal Nishank

नवी दिल्ली :- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ द्वारा १७ मे २०२१ रोजी अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (Atal Online Faculty Development Program) लाँच करतील. याबाबतची माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ट्विट करून दिली आहे.

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) निशंक यांनी ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे. अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२१-२२चे उद्घाटन रमेश पोखरियाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय ते राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाच्या सचिवांशी ऑनलाईन चर्चा करणार आहेत.

कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. रमेश पोखरियाल निशंक हे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील शिक्षणव्यवस्थेवर झालेल्या परिणामाविषयी चर्चा करण्याची शक्यता आहे. याशिवाय CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार हे पाहावे लागेल. या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षासुद्धा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button