महात्मा गांधी यांची १५१ वी तर लालबहादूर शास्त्री यांची ११६ वी जयंती

राज्यपालांचे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

Governor Bhagat Singh Koshyari - Mahatma Gandhi - Lal Bahadur Shastri

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राजभवन येथे महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचीदेखील आज ११६ वी जयंती आहे.

त्यानिमित्त राज्यपालांनी शास्त्रींच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनीदेखील महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना यावेळी अभिवादन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER