सातारा जिल्ह्यातील 15 माध्यमिक शाळा झाल्या कोरोनाबाधित

15 secondary schools in Satara district were affected

सातारा :- सातारा जिल्ह्यातील 15 माध्यमिक शाळा (15 secondary schools) कोरोनाबाधित (Corona Positive) झाल्या असून शाळेतील सुमारे 49 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाकडून शाळा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

सातारा जिल्ह्यातील पाचवी ते आठवीमधील 16 व नववी ते बारावीमधील 33 अशा मिळून 49 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी कोरोनाबाधित सापडले आहेत. त्या शाळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शिवाय जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने घालून दिलेल्या उपाययोजनांचे पालन करावे, अशा सूचना माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सर्व शाळा व महाविद्यालयांना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व विद्यालयाकडून रोजच्या रोज अहवाल मागवला जात आहे. त्यानुसार जावली तालुक्यात एका शाळेमधील 1, वाई तालुक्यात एका शाळेतील 3, कराड तालुक्यात दोन शाळेतील 6, कोरेगाव तालुक्यातील तीन शाळांमधील 3, खंडाळा तालुक्यातील 4 शाळामधील 4, खटाव तालुक्यातील 4 शाळामधील 32 असे मिळून 49 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये पाचवी ते आठवीमधील 16 विद्यार्थी तर नववी ते बारावीमधील 33 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

ही बातमी पण वाचा : साेशल मीडियासह न्यूज पोर्टल्सवरही सरकारची करडी नजर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER