बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के वाढ

Bank Salary Hike 15%

मुंबई : एकीकडे कोरोना व्हायरसच्या(Coronavirus) महामारीमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे कामगार कपात तसेच वेतन कपात सुरू आहे. असे असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँक(Bank) कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के वाढ होणार आहे. तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे. १ नोव्हेंबर २०१७ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वरील निर्णय घेण्यात आला. यामुळे बँकांना ७ हजार ९८८ कोटी रुपये अतिरिक्त खर्च कर्मचारी पगारापोटी करावे लागणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढसंदर्भात गेली दोन वर्षे चर्चा सुरू होती. त्यावर आता तोडगा निघाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER