वर्षाला १५ लाख पगार, पायल शहा होणार साध्वी!

Payal

अहमदाबाद : वर्षाला १५ लाख रुपये पगार असलेली पायल शहा (३१) संन्यास घेणार आहे. ती मुंबईतील एका फर्ममध्ये नोकरी करत होती. पायल सीएच्या परिक्षेत अखिल भारतीय स्तरावर टॉप रँकिंगमध्ये होती. ती मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एका मोठ्या कंपनीत २०१४ साली नोकरीला लागली. नंतर तिने जैन साध्वीची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आयुष्याच्या मानसिक तयारीसाठी पायल रोज पाच कि. मी. पायी चालायची.

२४ फेब्रुवारी रोजी पायल शहा सध्याच्या आयुष्याचा त्याग करणार असून साध्वीची दीक्षा घेणार आहे. साध्वीची दीक्षा घेणारी पायल ही त्यांच्या घरातील पहिलीच व्यक्ती आहे. पायलचे कुटुंबीय मूळचे गुजरातचे असून मुंबईत त्यांचे किचनवेअरचे दुकान आहे.

पायलने सांगितले की, माझा हा प्रवास सात वर्षापूर्वी सुरू झाला. माझ्या घराजवळ राहणाऱ्या जैन साध्वींच्या घरी जात असे. मला त्या आनंदी वाटायच्या. मोबाइल, सुट्टी नसतानाही त्या आनंदी होत्या. त्यानंतर मी त्यांच्यासोबत जवळपास वर्षभर राहिले. त्यानंतर मी नवीन आयुष्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. गुरू महाराज परमलोचन श्रीजी यांच्यासोबत झालेल्या चर्चेने आयुष्याला कलाटणी मिळाली.

पायलची लहान बहीण रीना ही पण एमबीए आणि सीएफए असून एका कंपनीत नोकरी करते. पायलने राजीनामा दिल्यानंतर कंपनीने तिचा पगार वाढवण्याची तयारी दर्शवली. मात्र, पायल त्याला नम्र नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER