ठाणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना 15 कोटींची नुकसान भरपाई

15 crore compensation to disaster victims

ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागासह शहरी भागात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यात पुराच्या पाणी लोकांच्या घरात घुसुन कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांनां मदत म्हणून शासनाच्यावतीने 20 कोटींचा निधी ठाणे जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे 15 कोटींच्या निधीची पात्र आपत्तीग्रस्तांना वाटप करण्यात येणार आहे. तसेच संबंधीत तहसिलदार कार्यालयास निधी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्याच्या 26 जुलै ते 29 जुलै या तिन दिवसाच्या कालावधीत पावसाने दमदार हजेरी लवली होती. सलग तिन दिवास सुरु असलेल्या पावसामुळे त्यात उल्हास, बारवी नदी दुधडी भरुन वाहू लागली होती. त्यामुळे बदलापुर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आदी भागात ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उल्हासनगरमधील वालधुनी नदीकाठावरील घरांमध्येदेखील पुराचे पाणी शिरले आहे. तर, कल्याण, भिवंडीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुरबाड, शहापूर तालुक्यांतही नदीकाठालगतच्या भातशेतीचे नुकसान झाले. या पूरस्थितीच्या कालावधीत कोट्यावधीं रुपयांचे नुकसान सद्य:स्थितीत दिसून येत आहे. घरात पाणी घूसुन झालेल्या नुकसानभरपाईच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार संबंधीत तहसिलदार कार्यालयाच्यावतीने पंचनामे करण्यात आले. त्यात पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट या कालावधीत देखिल पावसाने थैमान घातले होते. त्यावेळी देखिल हजारो लोकांच्या घरात पुराचे पाणी जावून नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत शहरी व ग्रामीण भागातील हजारो लोक बाधीत झाले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिख आपत्तीत बाधीत झालेल्यांच्या मदतीसाठी शासनाच्यावतीने 20 कोटींची रक्कम देण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील पात्र 17 हजार 958 लोकांना 14 कोटी 47 लाख 70 हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये शहरी भागातील 10 हजार 996 तर, ग्रामीण भागातील 6162 आपत्ती ग्रस्तांचा समावेश आहे.

दरम्यान, यापुर्वी शहरी भागातील आपत्तीग्रस्तांना 10 हजार तर, ग्रामीण भागातील लोकांना 5 हजार रुपयाप्रमाणे मदत देण्यात येत होती. मात्र, जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागासह शहरी भागात पावसाने आहार उडविला होता. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नैसर्गिक आपत्तीत बाधीत झालेल्यांना 5 हजाराची वाढीव मदत देण्यात येणार असल्याचा शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार शहरी भागातील आपत्तीग्रस्तांना 15 हजार रुपयाप्रमाणे तर, ग्रामीण भागातील लोकांना 10 हजार रुपयाप्रमाणे मदत देण्यात येणार आहे.