महाराष्ट्रातल्या १४,२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; १५ जानेवारीला मतदान

GramPanchayat Election

मुंबई :- महाराष्ट्रातल्या १४,२३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम (Gram Panchayat Election) जाहीर झाला आहे. या एप्रिल ते डिसेंबर २०२० कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायती आहेत. १५ जानेवारीला (January 15) मतदान होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात होईल. मतदान १५ जानेवारीला आणि मतमोजणी १८ जानेवारीला होईल.

निवडणूक कार्यक्रम

३१ डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल. ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसेच उमेदवारांची यादी ४ जानेवारीला  दुपारी ३ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER