
पुणे : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी ६ जवानांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच संसर्ग झालेल्या जवानांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथील एसआरपीएफ क्रमांक दोनची एक कंपनी बाहेरगावी बंदोबस्तासाठी गेली होती. १९ मे रोजी ही कंपनी बंदोबस्तावरून पुण्यात परतली. त्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने २० जवानांची चाचणी घेण्यात आली. त्यातून ६ जवान कोरोनाबाधित आढळले होते. तर काल आणखी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या सर्व जवानांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला