तिरुपति मंदिरातील ५० पैकी १४ पुजाऱ्यांना कोरोनाची लागण

Tirupati

मुंबई : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराच्या १४ पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. आज त्यांनी यासंदर्भात इतर पुजाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना आरोग्यविषयक सूचनाही केल्या. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान या मंदिरात एकूण ५० पूजारी आहेत. त्यापैकी १४ पुजाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. इतर पुजाऱ्यांची एक बैठक आज घेण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांना आरोग्यविषयक सूचना देण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER