आणखी 14 खाजगी रूग्णालये अधिग्रहीत – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

डॉ. अभिजीत चौधरी सांगली

सांगली : कोविड-19 (COVID-19) रूग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली असून यामध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये 375 आयसीयु बेडस् व 1 हजार 235 वॉर्ड बेडस, असे एकुण 1 हजार 610 बेडस् उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यापैकी 14 रुग्णालये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत असुन 13 रुग्णालये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये आहेत. या व्यतिरिक्त आणखी 14 खाजगी रूग्णालये कोविड रूग्णालये म्हणून अधिग्रहीत करण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी (Abhijeet Chaudhari) म्हणाले, कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली आहेत.

नागरिकांना या सर्व खाजगी व शासकीय अधिग्रहीत कोविड रुग्णालयांमध्ये असलेल्या एकुण बेडपैकी रिक्त असलेले आयसीयु बेडस व वॉर्ड बेडस ची माहिती तात्काळ व सहजरित्या उपलब्ध व्हावी म्हणुन संगणकीकृत बेड इन्फॉरमेशन सिस्टिम (Bed information system) विकसित करण्यात आलेली असुन या सिस्टिमवर दाखल होत असलेले रुग्ण व रुग्णालयांतुन डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण यांची माहिती रुग्णालयांकडुन Real Time अद्ययावत करण्यात येते. त्याचबरोबर रुग्णांना उपलब्ध बेडविषयी तात्काळ माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता, जिल्हा परिषद व महानगरपालिका येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले असुन ते 24×7 कार्यरत आहेत. जिल्हा परिषद नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2374900, 0233-2375900, 0233-2377900, 0233-2378900 आहे. नियंत्रण कक्षाकडे संपर्क करणारे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना बेड उपलब्धतेविषयी माहिती दिली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER