
रत्नागिरी/प्रतिनिधी : मिरज येथून रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 122 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 14 अहवाल पॉझिटिव्ह तर 107 अहवाल निगेटिव्ह आहेत. 01 अहवालाचा निष्कर्ष मिळालेला नाही. या नवीन कोरोनाबाधित अहवालांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 4, लांजा तालुक्यातील 3, गुहागर तालुक्यातील 3, कामथे येथील 3, दापोली तालुक्यातील 1 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यातील 04 रुग्ण कोव्हीड केअर सेंटर रत्नागिरी येथे दाखल करून घेण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी येथे रविवारीसकाळी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 07 झाली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला