शरद पवारांचा शब्द पाळणार; कान टोचताच अजितदादांनी बारामतीसाठी घेतला कठोर निर्णय

Ajit Pawar & Sharad Pawar

बारामती : सध्या देशात कोरोनाचे (Corona) सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून ये आहे. त्यातच युवा पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत आकस्मिक भेट देत अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पवारांच्या शब्दाला मनावर घेतले आहे. बारामती शहर तालुक्यात गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांनी त्रिशतक पार केले आहे. सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचा आलेख चढता राहिल्याने कडक निर्बंध लागु करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. यामध्ये मेडिकल,दूध वगळता सर्व सेवा,व्यवसाय बंद राहणार आहेत. बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने ‘सील’ करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्यधिकारी किरणराज यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार बारामती तालुका व शहर दि ७ सप्टेंबर ते २१ पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्री अजित पवार यांनी खुद्द हा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER