१३७ कोटी ६१ लाख बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा; हसन मुश्रीफ यांची माहिती

Hassan Mushrif

मुंबई :- कोरोनाचे संकट वाढल्याने सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात बांधकाम मजुरांसाठी सरकारने आर्थिक मदत केली आहे. राज्य सरकारने या बांधकाम मजुरांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. सरकारने गेल्या चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट मजुरांच्या खात्यात जमा केले आहे. याबाबतची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे.

“महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य केले आहे. चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा केले आहे. यामुळे कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.” असे मुश्रीफ यांनी सांगितले.

ऊर्वरीत कामगारांनाही अर्थसहाय्य मिळणार

सध्या महाराष्ट्रात १ मे २०२१ पर्यंत कडक निर्बंध लावले आहे. इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नाही. त्यामुळे कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता नोंदित कामगारांना दीड हजार रुपयाचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू होत आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र (Maharashtra) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात अली आहे. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.

त्याशिवाय या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी ही योजना मंडळाकडून राबवित असून आतापर्यंत २ लाख ३ हजार कामगारांना आरोग्य तपासणी केली आहे. याशिवाय सर्वच नोंदीत कामगारांची युद्धपातळीवर आरोग्य तपासणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना दुपारचे आणि रात्रीचे भोजन वाटप केले जात आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : केंद्राला साष्टांग नमस्कार करतो, पण लोकांना तडफडू देऊ नका : हसन मुश्रीफ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button