मुंबई हायकोर्टात १३ नवे न्यायाधीश

Mumbai HC - New Judges - Maharastra Today

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणुकीसाठी १३ जणांच्या नावांची शिफारस केली आहे. ‘कॉलेजियम’च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापैकी नऊ सध्या वकील आहेत तर चार जिल्हा न्यायाधीश आहेत. यात तीन महिला आहेत. न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेले वकील असे : अरुणा एस. पै, शैलेश पी. ब्रह्मे, कमल आर. खाता, शर्मिला यू. देशमुख, अमिरा अब्दुल रझाक, संदीप व्ही. मारणे, संदीप एच. पारिख, सोमशेखर सुंदरेशन आणि महेंद्र एम. नेर्लीकर. ज्या जिल्हा न्यायाधीशांना हायकोर्टावर बढती मिळणार आहे त्यांत राजेश एन. लद्धा, संजय जी. मेहरे, जी. ए. सानप आणि एस. जी. डिगे. या नव्या नियुक्त्या झाल्यावर उच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीश ७५ होतील.

ही बातमी पण वाचा : वडिलांनी केलेल्या दुसर्‍या विवाहाच्या वैधतेस मुलगी आव्हान देऊ शकते

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER