देशातील 13 विमानतळाचे होणार नामकरण

नवी दिल्ली : कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराजआंतरराष्ट्रीय विमानतळ’ (airports), तर औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामांतर लवकरच केले जाणार आहे. नागरी उड्डयन खात्याने देशातील 13 विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला असून, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी (Hardipsingh Puri) यांनी देशातील 13 विमानतळांच्या नामांतराचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे.

त्यात कोल्हापूरसह औरंगाबाद आणि शिर्डी या तीन विमानतळांचा समावेश आहे. शिर्डी विमानतळाचे ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामांतर करण्यात येणार आहे. याबरोबर आंध- प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब राज्यातील काही विमानतळांच्या नामांतराचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहितीही नागरी उडुडयनमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER