१२२ कथित ‘सिमी’ सदस्यांची ‘युएपीए’ खटल्यातून मुक्तता

UAPA

सूरत : बंदी घातलेल्या ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मूव्हमेँट ऑफ इंडिया’ (SIMI) या संघटनेचे सदस्य या नात्याने एक सभा आयोजित करून या संघटनेच्या कार्याचा प्रचार केल्याच्या आरोपावरून बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (UAPA) दाखल केलेल्या खटल्यातून येथील  न्यायालयाने १२२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

केंद्र सरकारने २७ सप्टेंबर, २००१ रोजी ‘सिमी’वर बंदी घातल्यानंतर त्यात वर्षी २८ डिसेंबर रोजी सूरत शहराच्या संग्रामपुरा भागातील एका सबागृहात ही सभा झाली होती. एकूण १२७ जणांना त्यावेळी अटक करून त्यांच्यावर ‘यूएपीए’ कायद्यान्वये खटला दाखल केला गेला होता. खटला प्रलंबित असताना पाच आरोपींचा मृत्यू झाला. बाकीच्या १२२ आरोपींची मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एन. दवे यांनी संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली. हे आरोपी ‘सिमी’चे सदस्य होते किंवा त्यांनी त्या प्रतिबंधित संघटनेच्या प्रचारासाठी ही सभा घेतली होती हे अभियोग पत्र निर्विवादपणे सिद्ध करू शकला नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

खटल्यातील हे आरोपी  गुजरातखेरीज तमिळनाडू, प. बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान व बिहार इत्यादी राज्यांतून सभेला आले होते. आपला ‘सिमी’शी काही संबंध नाही व ही सभा ‘ऑल इंडिया मायनॉरिटी एज्युकेशन बोर्डा’ने आयोजित केली होती, असा आरोपींचा बचाव होता.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER