पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील १२० कर्मचाऱ्यांचे राजीनामे

Pune Jumbo Covid Cenrter

पुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील (Jumbo Covid Center) ४० डॉक्टर (40 Doctors) आणि ८० नर्सने (80 Nurse) राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटर आता प्रशासन स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. लाईफ लाईन या कंत्राटदाराकडील जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

पुण्यातील हे जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप करण्यात येतो. हे रुग्णालय चालवण्यासाठी पुरेसे डॉक्टर ही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत १२० कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.

याच जम्बो हॉस्पिटलमध्ये युवा पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. वेळेवर कार्डियाक ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यानंतर कोविड सेंटरचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घातलेल्या बैठकीत लाईफ लाईनला ते जमत नसेल तर त्यांच्याजागी दुसऱ्या संस्थेला काम देण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने ही पावलं उचलली जात आहेत. पुणे महानगरपालिकेने चार अधिकाऱ्यांना जंबो कोविड सेंटरची जबाबदारी दिली आहे. प्रत्येकी सहा तासांची ड्युटी या अधिकाऱ्यांना लावली असून दोन अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

ही बातमी पण वाचा : रायकरांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई होणार – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER