दरवर्षी १ लाख विद्यार्थ्यांना १२ हजारांची शिष्यवृत्ती!

Scholarship - Student

नवी दिल्ली :- आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकरडून शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारकडून या योजनेअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांना मदत होते. ही शिष्यवृत्ती नववी ते बारावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते.

या शिष्यवृत्तीचा फायदा नववी ते बारावी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना होतो. सातवी व आठवीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना किमान ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न १.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

‘नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप’ म्हणजेच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी १ लाख विद्यार्थ्यांना दिला जातो. देशभरातील १ लाख विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र विद्यार्थी ‘नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप’ या योजनेसाठी अर्ज करू शकतात. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) scholarships.gov.in वर जाऊन विद्यार्थ्यी किंवा त्यांचे पालक, शाळा अर्ज करू शकते. दिलेल्या वेबसाइटवरून पात्र विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER