राज्यात १२ खेळांची नवी ३६ प्रशिक्षण केंद्रे

High Angle View Of Various Sport Equipments On Green Grass

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) खेलो इंडिया उपक्रमात (Khelo India) युवा खेळाडूंच्या त्यांच्या नजीकच्या ठिकाणी क्रीडा प्रशिक्षणाची (Sports training Centres) सोय व्हावी यासाठी देशभरात एक हजार आणि महाराष्ट्रात ३६ केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चार वर्षांसाठी ही केंद्रे मंजूर केली असून महाराष्ट्रात १२ खेळाच्या खेळाडूंना त्याचा लाभ होईल. त्यात  ॲथलेटिक्स, कुस्ती, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, तलवारबाजी, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, धनुर्विद्या, बॅडमिंटन व हॉलिबॉल यांचा समावेश असेल.

यात औरंगाबादला शूटिंग, उस्मानाबादला खो-खो तर सोलापूरला बॅडमिंटन केंद्र मंजूर झाले आहे. यावर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण असेल. या केंद्रांच्या माध्यमातून युवांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचीही नियुक्ती करण्यात येईल. या प्राेजेक्टसाठी क्रीडा मंत्रालयाने निधी उपलब्ध केला आहे. प्रत्येक केंद्राला एक वेळेस पाच लाखांचे अनुदान मिळणार आहे.

केंद्रे अशी –
-सातारा, नाशिक, चंद्रपूर, सांगली, नंदूरबार (ॲथलेटिक्स)
-लातूर, रायगड, कोल्हापूर, हिंगोली (कुस्ती)
-वाशिम, सिंधदुर्ग, बीड, मुंबई ( कबड्डी)
-उस्मानाबाद, जालना (खो-खो)
-नांदेड (टेबल टेनिस)
-बुलडाणा, भंडारा, परभणी (तलवारबाजी)
-जळगाव, वर्धा, अकोला, मुंबई (बॉक्सिंग)
-धुळे (फुटबॉल)
-यवतमाळ (हॉकी)
-गडचिरोली, अहमदनगर, अमरावती ( धनुर्विद्या)
-नागपूर, ठाणे, रत्नागिरी (बॅडमिंटन)
-पुणे (व्हॉलिबॉल)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button