सांगली जिल्ह्यात आणखी १२ व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह- डॉ. अभिजित चौधरी

Abhijit Choudhary

सांगली :- सांगली जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या व निरीक्षणाखाली असलेल्या १६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १२ रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य:स्थितीत सांगली जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशन कक्षात आहेत. जिल्ह्यात लागण झालेल्या २६ व्यक्तींपैकी २२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.