ट्रम्प परत गेले तरी दौरा गाजतोच आहे! उधळपट्टी नाही : भाजपा

Donald Trump - Vijay Rupani

गांधीनगर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचा सहकुटुंब दौरा करून अमेरिकेस परतही गेलेत; मात्र, त्यांचा दौरा खर्चाच्या मुद्यावरून गाजतोच आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद येथे मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

‘त्या’ शेतकर्‍याच्या कुटुंबाला हवी ती मदत देणार : गृहमंत्री अनिल देशमुख

ट्रम्प यांच्या तीन तासांच्या अहमदाबाद भेटीवर १०० कोटींचा खर्च झाल्याची टीका काँग्रेस करीत आहे. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. या पृष्ठभूमीवर, भाजपा नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे.

या सोहळ्यासाठी १०० कोटी नव्हे, तर साडेबारा कोटी रुपये खर्च झाल्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले आहे. या स्वागत सोहळ्यासाठी गुजरात राज्य सरकारने आठ कोटी आणि अहमदाबाद महानगरपालिकेने साडेचार कोटी रुपये मंजूर केले. काँग्रेसने १०० कोटींचा आकडा आणला कोठून? असा सवाल विजय रूपानी यांनी केला आहे