रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 11 पॉझिटिव्ह; एकूण 124

CORONA VIRUS

रत्नागिरी(प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांच्याकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण नव्याने आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 इतकी आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 124 इतका झालेले आहेत. यातील नऊ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. तथापि दोन रुग्ण तपासणी करून आपापल्या घरी गेलेले आहेत. त्यांचा तपास करण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोलडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला