दहावीचा निकाल जूनमध्ये, अभ्यासक्रमावरून मूल्यांकन; वर्षा गायकवाड यांची माहिती

Varsha Gaikwad

मुंबई :- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकालविषयी निकष जाहीर केले आहेत. निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल (10th result) जूनअखेर लावणार असल्याचे सांगतले आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील. आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना सरकसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शासनाकडून GR जारी
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षेसंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. आज दहावीच्या मूल्यमापन संदर्भात जीआर काढला आहे. कोरोनामुळे ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभरापासून सुरू आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गेल्यावर्षी मूल्यमापनाच्याआधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण केले होते. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी २४ बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

बारावी परिक्षेबाबत सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेणार आहोत. सीबीएसई सोबत बोलणे सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाचे मुद्दे –

 • – नववी, दहावीसाठी सुधारित नियमावली
 • – विद्यार्थ्यांचे १०० गुणांचे मूल्यपामन होईल.
 • – लेखी मूल्यमापनाला ३० गुण. प्रात्यक्षिक तोंडी २० गुण
 • – विषयनिहय ५० गुण नववीच्या आधारे.
 • – नववीच्या निकालावर आधारित ५० गुण. प्रत्येक विषयांचे १०० गुणांचे मूल्यमापन
 • – नववीचा ५० टक्के आणि दहावी ५० टक्के विषय निहायसाठी
 • – समाधानकारक निकाल वाटत नसेल तर विद्यार्थ्यांना दोन परीक्षा कोविडनंतर देता येईल.
 • – निकाल समिती मध्ये मुख्यध्यापकच्या खाली ७ सदस्य असतील.
 • – अकरावी प्रवेशासाठी आम्ही वैकल्पिक सीईटी परीक्षा घेणार. दहावीच्या अभ्यासक्रमावर ही प्रवेश परीक्षा असेल.
 • – ही परीक्षा २ तासांची असणार
 • – सीईटी परीक्षा मिळालेल्या मार्कनुसार प्राधान्यने प्रवेश दिले जातील आणि नंतर रिक्त असलेल्या जागांवर दहावीमध्ये अंतर्गत मूल्यमापन गुणांद्वारे प्रवेश.

Check PDF :-  दहावीचा निकाल जूनमध्ये, अभ्यासक्रमावरून मूल्यांकन; वर्षा गायकवाड यांची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button