दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा होणारच; राज्य सरकारचा निर्णय

Rajesh Tope

मुंबई : सीबीएसई आणि आयसीएसईप्रमाणे दहावीच्या परीक्षा रद्द (10th exam) करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

दहावीच्या परीक्षा रद्द
आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीदेखील या विषयावर मत मांडले. मात्र, कोरोनामुळे वर्षभर शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळाने हा निर्णय मान्य केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बारावीची परीक्षा होणारच
दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. सोबतच बारावीच्या परीक्षा होणारच, असे स्पष्ट झाले आहे. यामुळे बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.

वर्षा गायकवाड यांचे ट्विट
“महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती वाईट होत आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक यांचे आरोग्य आमच्यासाठी पहिले प्राधान्य आहे.” असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button