दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच, वर्षा गायकवाडांची माहिती

Varsha Gaikwad - Maharastra Today

मुंबई :- बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २० मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहे. याबाबतची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. कोरोनामुळे हे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहे. जर वर्गखोल्या कमी पडल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केले.

तसेच यंदा ८० गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटं अधिकचा वेळ दिला जाणार आहे. तर ४० आणि ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटं वाढवून दिली जाणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटं वाढवून दिले जाणार आहे. दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६ फेब्रुवारी २०२१ पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER