दहावी – बारावी परीक्षा : आयोजन समितीत विदर्भ, मराठवाडा, खांदेशातून कुणीही नाही!

Ram Kulkarni-Uddhav Thackeray

मुंबई :- राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन उपाय योजना करण्यासाठी ११ सदस्यांची समिती गठीत केली आहे. यात पुण्यातून १० आणि मुंबईतून एक सदस्य घेण्यात आला आहे.

या नियुक्तींवर आक्षेप घेताना भाजपाचे प्रवक्ते राम कुळकर्णी (Ram Kulkarni) म्हणालेत, दहावी – बारावीच्या परीक्षा राज्यभर होत असताना सरकारने या समितीवर विदर्भ, मराठवाडा आणि खांदेशातून एकही सदस्य घेतला नाही. सरकारच्या लेखी तज्ज्ञ मंडळी केवळ मुंबई, पुण्यातच आहेत का? सरकारला शिक्षणात समानतेची भाषा करण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही.

या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात राम कुळकर्णी म्हणालेत की, सत्ता बदलानंतर पुनर्रचना केली जाते तेव्हा महाराष्ट्राच्या सर्व विभागातुन शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ निवडले जातात. मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या लेखी केवळ पुण्यात व मुंबईतच तज्ज्ञ मंडळी आहेत. सरकारने विदर्भ, मराठवाडा, खान्देश विभागातील पात्र सदस्यांचा विचार केला नाही. शिक्षण विभागाची भूमिका समानतेच्या आधारावर असते आणि तशा बाता सत्ताधारी छाती बदडत नेहमीच देत असतात आणि अशी विषमतावादी भूमिका घेतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER