दहावी, बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन

मुंबई :- कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा (10th-12th Exam) ऑनलाईन (Online) की ऑफलाईन (Offline)? या चर्चेवर आता पडदा पडला आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याने ऑनलाईन परीक्षेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य मंडळाकडून या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. दोन्ही परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या बैठकीत झाल्याचे समजते. 15 दिवसांनंतर राज्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन परीक्षांबाबत शिक्षण विभाग निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यात दहावीचे 16 लाख, तर बारावीचे 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नसल्याचे चित्र आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबईकरांवर हे आहेत निर्बंध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER