मुंबईत सेवा देऊन परतलेल्या सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

ST Bus

मुंबई : राज्यावर अद्यापही कोरोनाचे (Corona) संकट कायम आहे . सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) कोरोनाची लागण झाली असल्याने एसटी प्रशासनाची चिंता वाढली आहे. हे सर्व कर्मचारी मुंबईमध्ये सेवा देऊन परतले होते. एकूण ४२५ कर्मचारी हे बेस्टला (BEST) मदत करण्यासाठी मुंबईला गेले होते. यापैकी १०६ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .

माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये नऊ डेपोंमधील चालक आणि वाहकांचा समावेश आहे. लॉकडाउनमध्ये बंद असलेली एसटी सेवा राज्य सरकारकडून पूर्ववत करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेत जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यासाठी मुभा दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER