९ महिन्यांत तब्बल १०५ पत्रकारांचे राज्यात बळी ; तरीही सरकारी मदत नाहीच

Sopan Bongane - Motichand Bedmutha - Ashok Tupe

मुंबई :- राज्यात गुरुवारी तीन ज्येष्ठ पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे संपूर्ण  पत्रकार जगताला हादरा बसला आहे. लोकसत्तात दीर्घकाळ पत्रकारिता केलेले सोपान बोंगाणे (Sopan Bongane), अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत जाणते पत्रकार अशोक तुपे (Ashok Tupe) आणि उस्मानाबाद येथील महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी मोतिचंद बेदमुथा (Motichand Bedmutha) यांचे कोरोनाने (Corona) निधन झाले.

आॅगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या ९ महिन्यांमध्ये १०५ पत्रकारांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. जवळपास दोन हजार पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली. धक्कादायक म्हणजे यावर्षी १ एप्रिलपासून गेल्या २२ दिवसात ३१ पत्रकारांचा कोरोनाने जीव घेतला.  महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्राचे एकही कार्यालय असे नाही जिथे कोरोनाची लागण झालेली नाही, एकही वृत्तवाहिनीचे कार्यालय असे नाही जिथे कोरोनाने शिरकाव केलेला नाही. तुटपुंज्या पगारात नोकरी करणाºया पत्रकारांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब अक्षरश: देशोधडीला लागले आहे. राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला एक पैशाचीही मदत केलेली नाही.

खरेतर पत्रकार हे कोरोना योद्धाच आहेत. वर्षभरापासून त्यांनी कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातही पत्रकारितेची कास सोडली नाही. आपला जीव धोक्यात टाकून त्यांनी वृत्तांकन केले. रोजच्या रोज आपापल्या कार्यालयांमध्ये जावून संपादकीय कामगिरी पार पडली. अनेक वृत्तपत्रे आणि वाहिन्यांच्या मालकांनी आपल्या येथील पत्रकार/कर्मचाºयांना वर्क फ्रॉम होम करण्याची अनुमती दिली नाही. साक्षात काळ पाठलाग करीत असल्याचे सध्याचे दिवस असले तरी जीव धोक्यात घालून पत्रकार काम करीत राहिले. अशावेळी पत्रकारांना कोरोना योद्धा समजून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांपर्यंतची मदत शासनाने करायला हवी होती. कोरोनाबाबत समाजजागृती, आरोग्य विषयक होणाºया गैरसोर्इंकडे शासनाचे व यंत्रणेचे लक्ष वेधणे, कोरोनाग्रस्तांवरील उपचारांसाठी लेखणी आणि वाणी झिजविण्याचे काम प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार सातत्याने करीत आहेत पण सरकारने जीव गमावलेल्या पत्रकारांप्रति कोणतीही सहानुभूती दाखविलेली नाही. काही राज्यांनी मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य केले पण पुरोगामी महाराष्ट्राच्या सरकारने पत्रकारांना पाठ दाखविली असा आरोप पत्रकार संघटनांचे नेते करीत आहेत. अनेकांनी मागण्यांची निवेदनेही दिली आहेत.

सोलापूरचे तरूण पत्रकार प्रकाश जाधव यांचे वडिल कोरोनाने गेले. आई आणि भाऊ पॉझिटिव्ह, स्वत:घरीच क्वारंटाइन अशा स्थितीत आर्थिक चणचण आणि औषधंही मिळत नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून प्रकाश जाधव यांनी आत्महत्या केली.परभणीचे अरूण हिस्वणकर हे देखील आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button